
भोसरी (Pclive7.com):- नागरिकांना सरकारी विविध योजनांचा आणि सेवांचा लाभ सुलभरित्या उपलब्ध करून देण्याकरिता अशोक पठारे सोशल फाउंडेशनच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शांतीनगर वसाहत मित्र मंडळ येथे दि.07 ते 09 ऑक्टोबर आणि प्रभू रामचंद्र सभागृह गव्हाणेवस्ती येथे दि.10 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत सौ. राणीमाई अशोक पठारे यांच्या सौजन्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात ई-श्रम कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, घरगुती कामगार कल्याण योजना, आभा कार्ड, सुकन्या समृद्धी योजना, मनरेगा योजना, क्रांतिज्योती सावित्री फुले बाल संगोपन योजना, संजय गांधी निराधार योजना, BOCW कार्ड, दिव्यांग व्यक्तींसाठी UDID या योजना व सेवा या शिबिरात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अशोक तात्या पठारे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध समाजउपयुक्त योजना सर्वसामान्य नागरिकांना माहिती व सुविधा देण्यासाठी विविध ठिकाणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक पात्र नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा व आपल्या हक्कांच्या योजनांचा फायदा करून घ्यावा.
– सौ.राणीमाई अशोक पठारेसामाजिक कार्यकर्त्या






















Join Our Whatsapp Group