मोशी (Pclive7.com):- संकल्प लाडशाखीय वाणी समाज मंडळ, मोशी यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा व पारिवारिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि एकात्मतेच्या वातावरणात पार पडले. या कार्यक्रमात मंडळाच्या वतीने सुमारे १५० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून क्रेस्ट वेल्थचे कार्यकारी संचालक योगेशजी पिंगळे आणि सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. अमोलजी सोनजे उपस्थित होते. डॉ. सोनजे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आकर्षित गिफ्ट्स बघून विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
या सोहळ्यास भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी महापौर राहुल जाधव, कामगार नेते सचिन लांडगे भाजपा ओबीसी महाराष्ट प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राम्हणकार, निलेश बोराटे, निखिल बोऱ्हाडे, योगेश तळेकर, अमोल वाणी आदी मान्यवर यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिकच प्रेरणादायी ठरला. तसेच संकल्प दिनदर्शिक 2026 च्या कव्हर पेजचे अनावरण शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आले.

समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शिक्षण व संस्कार यांचा संगम घडविण्याचा हा उपक्रम समाजविकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरला आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील एकात्मता वृद्धिंगत होऊन तरुण पिढीला योग्य दिशादर्शन मिळत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

संकल्प मंडळाचे अध्यक्ष किशोर ब्राह्मणकर, उपाध्यक्ष अतुल फुलदेवरे यांच्या नियोजनातून खजिनदार स्वप्नील नानकर व स्वप्निल मुसळे सचिव कुणाल पिंगळे व स्वप्निल कोतकर यांच्या देखरेखीखाली संघटक विशाल पाखले संचालक गुणवंत पाखले, तेजस येवले, भूषण वाणी, गौरव मालपुरे, अतुल येवले, उमेश येवले, आनंद येवले, प्रणित दहीवेलकर, अमोल येवले, केतन वाणी, स्वप्नील सोनकुळे, नितीन बोरसे, योगेश्वर येवले, सुधीर पाटे आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.























Join Our Whatsapp Group