
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत राबविलेल्या घातक अग्निशस्त्रे शोध मोहिमेमध्ये रेकॉर्ड वरील तीन गुन्हेगारांकडून घातक अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यात ४ पिस्तुलासह पाच काडतुसांचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने रेकॉर्ड वरील गुन्हेगार प्रवीण गुंडेश्वर अंकुश, विकी दीपक चव्हाण आणि रोहित फुलचंद भालशंकर यांना मोठ्या शिताफीने सापळा लावून ताब्यात घेतलं आहे, त्यांच्याकडून ४ पिस्तूल आणि ५ जीवंत काडतुसे ही जप्त केली आहेत.

सदरची कारवाई युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक दिपक खरात, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय गवारे, प्रविण दळे, नितिन ढोरजे, पोलीस हवालदार कृणाल शिंदे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, भाऊसाहेब राठोड, विक्रम कुदळ, बाबा चव्हाण, अली शेख, कृष्णा शितोळे, पोलीस शिपाई प्रशांत सैद, सुखदेव गावंडे, अनर राणे, दिनकर आडे, रवि पचार, धनंजय जाधव यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group