
पिंपरी (Pclive7.com):- चऱ्होली येथे नितीन गिलबिले हत्या प्रकरणातील आरोपी विक्रांत ठाकूर याला पिंपरी- चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अमित पठारे मात्र अद्याप ही फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

दोन दिवसांपूर्वी चऱ्होली येथे फॉर्च्युनर गाडीत नितीन गिलबिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. नितीनला रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच फेकून पायावर गाडी घालून अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे पसार झाले होते. त्याचा शोध पिंपरी- चिंचवड पोलीस घेत होते. अखेर विक्रांत ठाकूर याला लोणावळा ॲम्बेवॅली परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. जागेचे प्लॉटींग आणि संपत्तीच्या वादावरून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

अद्याप अमित पठारे हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. अमित पठारे पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यास हत्येचं कारण समोर येऊ शकतं. हत्येचा सीसीटीव्ही देखील समोर आला असून अत्यंत क्रूरपणे जवळून पिस्तूलातून गोळ्या झाडून नितीन गिलबिलेची हत्या करण्यात आली होती. त्याला जखमी अवस्थेत फेकून देण्यात आलं. पायावरून गाडी घालून दोन्ही आरोपी हे पसार झाले होते. आता अमित पठारेचा शोध पोलीस घेत आहेत.























Join Our Whatsapp Group