पुणे (Pclive7.com):- ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना काळे फासण्याचा इशारा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले. पुण्यात एका आंदोलनादरम्यान त्यांनी चंदनवाले यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता, यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून अधिष्ठाता म्हणून नेमणूक करून घेतल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला होता. बनावट प्रमाणपत्र सादर करून चंदनवाले यांनी शासन आणि अपंगांची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यानी त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
डॉ. चंदनवाले हे मुळचे जळगावचे रहिवाशी असल्याने त्यांच्यावर भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा वरदहस्त आहे. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोपही देसाई यांनी केला आहे. यावेळी त्यांनी चंदनवाले यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता.






















Join Our Whatsapp Group