पुणे (Pclive7.com):- अध्यात्मिक गुरु दादा जे. पी. वासवानी यांचे निधन झाले. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साधु वासवानी मिशनचे ते प्रमुख होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मिशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
दादा वासवानी यांचा जन्म २ ऑगस्ट १९१८ रोजी झाला. शाकाहाराला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच प्राण्यांच्या हक्कांसाठी ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. टी. एल. वासवानी यांनी स्थापन केलेल्या साधु वासवानी मिशनचे ते प्रमुख होते. मिशनचे मुख्यालय पुण्यात आहे. भारतासोबत जगभरात मिशनची केंद्रे आहेत. वासवानी यांनी आतापर्यंत १५० हून अधिक प्रेरणादायी पुस्तके लिहिली आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते.
दादा वासवानी यांच्याविषयी १० महत्वपूर्ण गोष्टी
२ ऑगस्ट १९१८ रोजी हैदराबाद येथे जन्मएम.एस्सी (भौतिकशास्त्र) विषयात पदवी संपादनदादा वासवानी यांनी लिहिलेल्या शोधप्रबंधाचे परीक्षण नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांनी केले होते. साधु वासवानी मिशनचे प्रमुखसिंधी समाजाचे धर्मगुरु म्हणून त्यांची ओळख शिकागो येथील जागतिक धर्म संसद आणि न्यूयॉर्क येथील जागतिक शांतता परिषदेला त्यांनी संबोधित केले होते. येत्या २ ऑगस्टला दादा वासवानी वयाची शंभर वर्षे पूर्ण करणार होते. सामाजिक बंधुता आणि एकात्मतेसाठी कार्यरत, प्राण्यांच्या हक्कांसाठी चळवळ शाकाहाराला हयातभर प्रोत्साहन, तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर इतरांना आनंदित करा, हे वासवानी यांचे जीवन सूत्र होते. दादा वासवानी यांच्या विचारांनी प्रभावित वर्ग देशभरात पसरला आहे.






















Join Our Whatsapp Group