पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले संजोग वाघेरे पाटील हे आज (दि.२०) भारतीय जनता पक्ष जाहीर प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे त्यांचा प्रवेश होणार असून पिंपरी गाव येथून ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.

नुकताच संजोग वाघेरे पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्या नंतर वाघेरे हे भाजपात प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. आज ते भाजपात दाखल होत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रवेशामुळे शहरात भाजपाची ताकद मोठी वाढणार आहे.

संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर पद भूषवले आहे. महापालिकेत नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पद तसेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती. गेल्यावर्षी मावळची लोकसभा निवडणुक देखील त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाकडून लढवली होती. या निवडणुकीत मोठं मतदान त्यांना झालं होतं.























Join Our Whatsapp Group