
पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) च्या वतीने प्रभाग क्रमांक २१ (पिंपरीगाव, अशोक थिएटर, जिनामाता हॉस्पिटल, मिलिंदनगर परिसर) येथे आज (दि.२३) प्रचाराच्या भव्य शुभारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रचार शुभारंभाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे आणि डब्बू आसवानी हे परिवर्तनाचा एल्गार पुकारत विजयाचा निर्धार व्यक्त करणार आहेत.

आज मंगळवार, दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता पिंपरी गाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा भव्य प्रचार शुभारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

प्रभागातील विकास, नागरिकांच्या समस्या आणि भविष्यातील दिशा याबाबत मार्गदर्शन करत परिवर्तनाचा संदेश देण्यात येणार आहे. या भव्य प्रचार शुभारंभाला उपस्थित रहावे असे आवाहन संदीप वाघेरे आणि डब्बू आसवानी यांच्या वतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group