पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, तुळजाईवस्ती, विठ्ठलवाडी, दत्तवाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला. संपूर्ण प्रभागात प्रचार फेरी काढली. त्याला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत केले.

उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद कुटे, विशाल काळभोर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पत्नी प्रिया बनसोडे, कविता खराडे, गणेश लंगोटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचार फेरीत सहभागी झाले होते. नागरिकांनी उमेदवारांचे उत्साहात स्वागत केले. प्रचार फेरीत तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. उमेदवारांनी नागरिकांशी आपुलकीने संवाद साधला. गाठीभेटी घेतल्या. नागरिकांचा प्रतिसाद पाहता राष्ट्रवादीच्या संपूर्ण पॅनेलचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक १४ मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. आणखी कामे करायची आहेत. प्रभागाच्या नियोजनबद्ध विकासाचा आराखडा तयार आहे. प्रभागाची वेगळी ओळख निर्माण केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची ताकद पाठिशी आहे. त्यामुळे विकास निधीची कमकरता भासणार नाही. प्रभागाचा सर्वांगीण विकास केला जाईल, अशी ग्वाही चारही उमेदवारांनी नागरिकांना दिली.























Join Our Whatsapp Group