पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) ओबीसी विभागाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते तसेच कार्याध्यक्ष फजल शेख व प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदवाटप समारंभ पार पडला. मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे आयोजित या कार्यक्रमात उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस व संघटन सचिव अशा विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या.

या नव्या कार्यकारिणीमुळे ओबीसी विभागाला बळकटी मिळाली असून, पक्ष संघटन अधिक मजबूत होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षश्रेष्ठींकडून अभिनंदन करण्यात आले. आगामी काळात जनसंपर्क वाढवून पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला, अशी माहिती ओबीसी शहराध्यक्ष प्रशांत महाजन यांनी दिली.

नवनियुक्त कार्यकारिणी पुढीलप्रमाणे..
उपाध्यक्ष :
सोमनाथ महाजन, उमेश आवटे, नितीन कुटे, सतीशकुमार चोरमले, सागर सुतार
सरचिटणीस :
दादासाहेब पवार, पंकज चव्हाण, मोतीलाल महाजन, पंकज बनकर, गोपाल शर्मा, संदीप पवार, महेश शिरोडे, विजय महाजन, महेश देवकर, ऋषिकेश आल्हाट, दीपक पाटील, नागनाथ भोसले, सय्यद इसाक
चिटणीस :
ललितकुमार शर्मा, गणेश रोटे, सागर महाजन, शरद फुलसुंदर, जितेंद्र पाटील
संघटन सचिव :
संकेत सुतार, अब्दुल तांबोळी, नागमणी तिवारी, आनंद बिरादार, अजय बोरकर, मनोहर पाटील, अथर्व माने

या नवनियुक्त कार्यकारिणीच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडत राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.






















Join Our Whatsapp Group