पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीत मोठ्या संख्येने इनकमिंग सुरू असताना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात आज (दि.२५) पिंपरी चिंचवड शहरात एक गुप्त बैठक पार पडली.

या बैठकीला शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, शहराध्यक्ष तुषार कामठे, सुनील गव्हाणे, अजित पवार राष्ट्रवादीचे नेते अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत ही बैठक निगडी प्राधिकरण येथे पार पडली.

या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येत भाजपाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अजित गव्हाणे यांनी दिली आहे. काही जागेवर दोन्ही राष्ट्रवादीत चर्चा सुरू असून इतर जागेवर संगनमत झाले आहे. आज सर्व नेत्यांची अजित पवारांसोबत बैठक होईल त्यानंतर येत्या एक-दोन दिवसांत जागा वाटपा संदर्भात निर्णय देखील जाहीर केला जाईल अशी माहिती अजित गव्हाणे यांनी दिली.























Join Our Whatsapp Group