पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार शरद गायकवाड यांनी सोसायटी धारकांच्या गाठीभेटींवर विशेष भर दिला आहे. तरुण वयातच सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी प्रभागात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

या अनुषंगाने शरद गायकवाड यांनी पिंपळे निलख प्रभागातील शिक्षक सोसायटी तसेच ओल्कन (Olcan) सोसायटीतील नागरिकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या दैनंदिन समस्या जाणून घेतल्या. पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था तसेच सुरक्षिततेबाबतच्या अडचणी नागरिकांनी मांडल्या.

प्रभागाला ‘स्मार्ट प्रभाग’ म्हणून विकसित करण्याचे स्पष्ट व्हिजन शरद गायकवाड यांनी यावेळी मांडले. चांगल्या दर्जाचे रस्ते, भाजी मंडई, क्रिकेट ग्राउंड, मुबलक व नियमित पाणीपुरवठा, दर्जेदार शैक्षणिक संस्था तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे अशा सर्व आवश्यक सुविधा प्रभागातील नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचेही शरद गायकवाड यांनी यावेळी सांगितले.






















Join Our Whatsapp Group