मामुर्डी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधील भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार जया दिलीप राऊत (कमळ निशाण) यांनी रविवारी (दि.२७) सकाळी मामुर्डी गावचे ग्रामदैवत श्री. काळभैरवनाथ मंदिरात अभिषेक व विधीवत पूजा करून आपल्या निवडणूक प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला.

या प्रचार शुभारंभाचे आयोजन शिवशक्ती तरुण मंडळ, भैरवनाथ महाराज उत्सव समिती आणि शिवशंभो भजनी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मामुर्डी, विकासनगर, किवळे, रावेत, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, साईनगर येथील ग्रामस्थांसह भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महिलांचा लक्षणीय सहभाग लाभला.

प्रचाराच्या प्रारंभी जया राऊत यांनी मामुर्डी येथील भैरवनाथ मंदिरासह हनुमान मंदिर, दुर्गा माता मंदिर (आदर्शनगर), जय गणेश चॅरिटेबल ट्रस्ट, गणेश मंदिर, दत्त मंदिर, साई मंदिर, महर्षी वाल्मिकी समाज मंदिर, वीरबाबा मंदिर, गुरुद्वारा तसेच विकासनगर–किवळे, रावेत व साईनगर परिसरातील विविध मंदिरांमध्ये दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला.

यानंतर त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत थेट संवाद साधत प्रचाराला सुरुवात केली व नागरिकांकडून आशीर्वाद घेतला. विकासकामांच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार यावेळी जया राऊत यांनी व्यक्त केला.






















Join Our Whatsapp Group