यमुनानगर (Pclive7.com):- यमुनानगर परिसरातील विकासाचे शिल्पकार आणि जनसामान्यांचा विश्वास असलेल्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ. सुलभा रामभाऊ उबाळे यांनी प्रभाग क्रमांक १३ मधून उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्धार केला असून, त्यानिमित्ताने सोमवारी (दि.२९ डिसेंबर) सकाळी १० वाजता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

“चला विकासपर्वाचे साक्षीदार व्हायला… चला उमेदवारी अर्ज भरायला…” या घोषणेसह ही रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात येणार असून, यमुनानगरच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या आणि जनतेचा भक्कम आधार असलेल्या सुलभा उबाळे यांच्या पाठीशी नागरिक मोठ्या संख्येने उभे राहणार असल्याचे चित्र आहे.

ही रॅली युवा सेना कार्यालय येथून सुरू होणार असून, खरात दूध केंद्र, प्रभु रामचंद्र चौक, ठाकरे मैदान (राम मंदिर), अमृतानंद मठ, सुवर्णयुग मित्र मंडळ, लक्ष्मी नगर–साईनाथ नगर, अंकुश चौक, पवळे शाळा, संजय हॉटेल, सेक्टर ११ साईबाबा मंदिर, ज्यूबली ग्राउंड, दिनेश च्यू. मार्केट आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे.

“नव्या पर्वाची चाहूल, विकासाकडे टाकलंय पाऊल… चला देऊया साथ, धरुया शिवसेनेचं हात!” या संदेशासह शिवसैनिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुलभा रामभाऊ उबाळे या प्रभाग क्रमांक १३ मधून निवडणूक रिंगणात उतरत असून, या रॅलीमुळे यमुनानगर परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.






















Join Our Whatsapp Group