पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडी प्रभागातून माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करत कुटे यांनी विजयाचा शंखनाद केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे यांच्याकडे कुटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमध्ये कुटे यांच्यासह विशाल काळभोर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे हे चार उमेदवार आहेत. या पॅनेलला प्रभागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांकडून उत्स्फुर्तपणे स्वागत केले जात आहे. कुटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमोद कुटे म्हणाले, प्रभागातील नागरिकांशी कुटे कुटुंबाचे जिव्हाळ्याचे नाते आहे. प्रभागातील नागरिक नेहमीच आमच्या कुटुंबाच्या पाठिशी उभे राहले आहेत. नागरिकांच्या आशिर्वादाने नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. प्रभागातील जनता यावेळी देखील ठामपणे पाठिशी उभी आहे. त्यामुळे महापालिका सभागृहात पाठवून पुन्हा सेवा करण्याची संधी देईल, याचा मला ठाम विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण पॅनेल विजयी होईल, याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

विकास कामांचा डोंगर..
मागील पाच वर्षात जनतेच्या साथीने प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. प्रभागात शंभर खाटांचे कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय सुरु केले. याचा प्रभागातील मध्यमवर्गीय, गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना मोठा फायदा होत आहे. कमी पैशांत दर्जेदार उपचार मिळत आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करणारी कमान उभारली. प्रभागातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले. पदपथावर पेव्हिंग ब्लॉक बसविले. कै. मल्हारराव कुटे अध्यात्मिक व सांस्कृतीक भवन, समाजभूषण डॉ. नानासाहेब धर्मादारी उद्यानाची निर्मिती केली. भगवान गौतम बुद्ध विहार चौकाचे अनावरण, प्रभागात गॅस वाहिनीची फिटिंग करुन दिली. नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोफत चष्मे वाटप केले. प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा निर्धार असून जनतेच्या साथीने प्रभागाला आदर्श मॉडेल करणार आहे.






















Join Our Whatsapp Group