पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली आहे. भाजपाचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे आणि रिटा सानप यांनी एकजुटीने प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.

यावेळी उद्योजक कार्तिक लांडगे, महादेव दादा कवितके, संतोष ठाकूर, अरुण पाडुळे, कविता हिंगे, सुधाकर धुरी, अजय सायकर, विजय घोडके, बालाजी कनवटे, यशवंत कन्हेरे, अशोक मगर, प्रकाश धोंडे आदी उपस्थित होते.
प्रभाग क्र. ११ अंतर्गत नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, कुदळवाडी भाग, कृष्णानगर, शरदनगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, पुर्णानगर, शिवाजी पार्क, शिवतेज नगर, म्हेत्रे वस्ती, स्वस्त घरकुल प्रकल्प, अजंठानगर, दुर्गानगर आदी भागांचा समावेश असून या सर्व परिसरात भाजपाच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रचाराची सुरुवात चिखली येथील श्री विठ्ठल-रुक्मीणी मंदिरात दर्शन व आशीर्वाद घेऊन करण्यात आली. त्यानंतर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत प्रचाराचा भव्य शंखनाद झाला. “विकास, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक प्रगती” या मुद्द्यांवर भर देत भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी घराघरांत जाऊन संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी स्थानिक विकासकामांचा लेखाजोखा मांडत आगामी काळातील पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व सुरक्षितता यांसाठी ठोस आराखडा सादर करण्यात आला. संघटित प्रचार, अनुभवी नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची ताकद यामुळे प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपाचा प्रचार अधिक प्रभावी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. एकूणच, प्रभाग ११ मध्ये भाजपाच्या एकजुटीने सुरू झालेल्या प्रचारामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत वातावरण तापू लागले असून आगामी दिवसांत राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची चिन्हे आहेत.

प्रभाग क्रमांक ११ मधील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा, विकासकामे आणि सुरक्षित भवितव्य हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास करून हा परिसर पिंपरी-चिंचवडमधील आदर्श प्रभाग म्हणून उभा करू, हीच आम्ही जनतेला ठाम हमी देतो.– निलेश नेवाळे, उमेदवार, भाजपा, प्रभाग-११.






















Join Our Whatsapp Group