पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पिंपळे निलख, कस्पटे वस्ती प्रभाग क्रमांक २६ मधून भारतीय जनता पार्टीकडून सौ. स्नेहा रणजित कलाटे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी बोलताना स्नेहा कलाटे म्हणाल्या की, ही उमेदवारी केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून जनतेच्या विश्वासावर आधारित सेवाभावी संकल्प आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी, तरुणांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, भारतीय जनता पार्टीच्या विकास, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या मूल्यांना पुढे नेण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. पक्षाच्या अधिकृत उमेदवारीबद्दल आभार मानताना स्नेहा कलाटे यांनी सांगितले की, भाजपने माझ्यावर दाखविलेला विश्वास माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. “पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व सहकाऱ्यांनी दिलेले पाठबळ माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. पक्षाच्या विचारधारेनुसार प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी, मूलभूत प्रश्नांसाठी आणि न्यायहक्कांसाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

जनतेच्या आशीर्वादाने व पाठिंब्याने हा लोकशाहीचा प्रवास यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जनतेसाठी समर्पित, विकासासाठी कटिबद्ध अशी भूमिका घेऊन स्नेहा कलाटे यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.
























Join Our Whatsapp Group