प्रभाग क्र. १६ मधून शिवसेनेच्या ऐश्वर्या तरस यांचे विरोधकांसमोर तगडे आव्हान
रावेत (Pclive7.com):- “होय, आम्ही स्मार्ट रावेत करणारच” असा परिवर्तनाचा ठाम नारा देत शिवसेनेच्या रणरागिणी सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी प्रभाग क्रमांक १६ (रावेत–किवळे) मधून निवडणुकीच्या मैदानात दमदार एंट्री केली आहे. गेल्या अनेक वर्षांत केलेल्या सातत्यपूर्ण सामाजिक आणि विकासात्मक कामगिरीमुळे येणाऱ्या निवडणुकीत सौ. ऐश्वर्या तरस या विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

शिवसेना पक्षाकडून सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी ओबीसी महिला प्रवर्गातून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या सात वर्षांपासून प्रभागातील मूलभूत प्रश्न, नागरी सुविधा, महिला-युवकांचे प्रश्न तसेच सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांनी केलेले निस्वार्थ कार्य आज त्यांच्या मजबूत जनसंपर्काचे प्रमुख कारण ठरत आहे. “तळागाळात जाऊन काम करणारी, सर्वसामान्यांशी थेट संवाद ठेवणारी उमेदवार” अशी ओळख त्यांना लाभली आहे.

सत्ताधारी मंडळींकडून अनेक वर्षे घराणेशाहीच्या माध्यमातून पदे उपभोगली गेली. मात्र विकासकामे आणि जनतेच्या प्रश्नांबाबत अपेक्षित सक्रियता दिसली नाही, अशी नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. घराणेशाहीच्या पायंड्याला जनता कंटाळली असून, प्रत्यक्ष काम करणाऱ्या आणि जनतेच्या सुखदुःखात उभ्या राहणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा सूर प्रभागात उमटत आहे.

“देशात नरेंद्र, राज्यात एकनाथराव आणि देवेंद्र, तसेच प्रभाग क्रमांक १६ मध्ये ऐश्वर्या राजेंद्र तरस” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकायला मिळत असून, प्रभाग १६ मधून शिवसेनेच्या सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस या निश्चितच नगरसेविका होतील, असा विश्वास अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.
























Join Our Whatsapp Group