पिंपरी :- थेरगाव प्रभाग क्रमांक २४ मध्ये शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवसेनेचे उमेदवार विश्वजीत बारणे, नीलेश बारणे, शिवसेना पुरस्कृत उमेदवार रुपाली लालासाहेब गुजर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माया बारणे यांनी प्रभागात घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचाराला वेग दिला आहे.

प्रचारादरम्यान उमेदवारांनी मतदारांसमोर ‘आदर्श प्रभाग’ उभारण्याचे स्पष्ट व्हिजन मांडले. प्रदूषणमुक्त पर्यावरण, मूलभूत सोयी-सुविधांना प्राधान्य, तसेच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधील दुवा अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभारातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.

प्रभागातील गणेशनगर, मयूरेश्वर मंदिर परिसर, एकता कॉलनी, शिव कॉलनी, गुजरनगर आदी भागांमध्ये उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. या भेटींना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलचे चारही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्ते आणि नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.






















Join Our Whatsapp Group