पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १४ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन कॅबिनेट मंत्री मा. सौ. पंकजाताई मुंडे यांची भव्य जाहीर सभा आज शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभाग क्रमांक १४ मधील उमेदवारांच्या प्रचारात मोहननगर येथे आयोजित करण्यात आली आहे.

ही सभा दत्त मंदिर चौक, मोहननगर येथे पार पडणार असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या जाहीर सभेत भाजपा अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री पंकजाताई मुंडे मार्गदर्शन करणार आहेत.

प्रभाग क्रमांक १४ मधून भाजपा- आरपीआय (आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. कैलास गणपत कुटे, सौ. मीनल विशाल यादव, सौ. ऐश्वर्या अमित बाबर आणि श्री. प्रसाद शंकर शेट्टी हे निवडणूक रिंगणात असून, “तुमची आमची भाजपाची साथ” या संदेशासह मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ही जाहीर सभा भाजपासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






















Join Our Whatsapp Group