पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्रकार समोर आला असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न फसला आहे. हे प्रकरण BJP च्या एका नेत्याने करण्यात आले आहे असे संबंधित स्क्रीन शॉर्ट वरून स्पष्ट झाले आहे. ८ जानेवारी २०२६ रोजी जल वायू विहार जवळील मोकळे मैदानावर आयोजित कार्यक्रमात लोकांनी पाठ फिरवल्याने, आता फेक स्क्रीनशॉटच्या आधारे विरोधकांना बदनाम करण्याचे षडयंत्र आखले जात असल्याचा खळबळजनक आरोप समर्थकांकडून करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?
जल वायू विहार जवळील त्रिवृक्ष मंदिराचे भूमी पूजन कार्यक्रम भाजप उमेदवारांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. मंदिराचे भूमी पूजनाची ही वेळ होती म्हणूनच या कार्यक्रमाला नागरिकांनी अत्यंत अल्प प्रतिसाद दिला. दर वेळी फसवे आश्वासन पाहून लोकांची गर्दी कमी होती. मैदानावरील रिकाम्या खुर्च्या पाहून भाजपच्या गटात अस्वस्थता पसरली. हे अपयश झाकण्यासाठी बड्या नेत्यांनी एक बनावट मेसेज तयार करून तो सुरेश कार्डिले यांना पाठवला आणि त्यानंतर सर्व व्हॉट्सॲप ग्रुपवर पसरवण्याच्या सूचना दिल्या. या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून NCP उमेदवार यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला.

भूलथापांना जनता बळी पडणार नाही..
मंदिराच्या भूमिपूजनाचा वापर निवडणुकीसाठी करणे आणि त्यातही गर्दी नसल्याने खोटे मेसेज पसरवणे, ही भाजपच्या प्रचाराची घसरलेली पातळी दर्शवते. “लोकांना खोट्या भूलथापा देऊन फसवण्याचे दिवस आता संपले आहेत. गुरुदेवदत्ताच्या कृपेने आणि सत्याच्या बळावर विरोधकांचे हे षडयंत्र उघडे पडले आहे,” अशी प्रतिक्रिया प्रभागातील कार्यकर्त्यांनी दिली आहे.
आचारसंहितेचे उल्लंघन..?
धार्मिक स्थळांचा आणि मंदिराच्या नावाचा वापर राजकीय फायद्यासाठी करून मतदारांवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न म्हणजे थेट आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचे मत कार्यकर्त्यांचं आहे.
























Join Our Whatsapp Group