पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य पदयात्रा आज निगडी प्रभाग क्रमांक १३ मध्ये उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

निगडी गावठाण, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, सेक्टर २२, यमुनानगर परिसरातून मार्गक्रमण करत ही पदयात्रा संजय हॉटेलपासून सुरू होऊन राहुलनगर चौक, फातिमा मस्जिद आझाद चौक, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर कमान, साईनाथनगर, लक्ष्मीनगर, निगडी गावठाण, माता अमृतानंदमयी मठ मार्गे प्रबोधनकार ठाकरे ग्राउंड येथे समाप्त झाली.

या पदयात्रेत मनसेचे उमेदवार श्री. शशिकिरण पंढरीनाथ गवळी (अ गट – अनुसूचित जाती), सौ. अश्विनी सचिन चिखले–मराठे (क गट – सर्वसाधारण महिला) आणि श्री. सचिन तुकाराम चिखले (ड गट – सर्वसाधारण पुरुष) यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचा विश्वास व्यक्त केला. ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांचा वर्षाव, घोषणाबाजी व जल्लोष करत उमेदवारांचे स्वागत केले.
“मनसेसोबत विकासाची नवी सुरुवात” या घोषवाक्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पदयात्रेमुळे निगडी प्रभागात सकारात्मक राजकीय वातावरण निर्माण झाले असून, बदलाच्या अपेक्षेने नागरिक मोठ्या विश्वासाने पुढे येताना दिसत आहेत. ही पदयात्रा म्हणजे केवळ प्रचार नव्हे, तर जनतेचा वाढता पाठिंबा आणि आगामी निवडणुकीतील विजयाचा स्पष्ट संकेत असल्याची प्रतिक्रिया उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनी व्यक्त केली.























Join Our Whatsapp Group