पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिला भगिनी व ज्येष्ठांचा सन्मान केला जातो. एनसीपीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत महिलांना सत्तेमध्ये सहभागी करून महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, महिला बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, परिवहन समिती अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे देऊन त्यांना समाजात सन्मान मिळवून दिला आहे. अजित दादांनी दूरदृष्टीकोण डोळ्यापुढे ठेवून घेतलेल्या निर्णयामुळेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ५० टक्के पेक्षा जास्त महिला नगरसेवक झाल्या. महिला आणि ज्येष्ठांचा सन्मान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा संकल्प या प्रभागातील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी करावा असे आवाहन माजी नगरसेविका सविता धनराज आसवानी यांनी केले.

धोका कॉलनी, उद्यम नगर, आनंद नगर, दळवी नगर परिसरात आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सविता आसवानी व इतर सर्व उमेदवारांनी संवाद साधला.

यावेळी माजी उपमहापौर जगन्नाथ साबळे, माजी नगरसेवक काळूराम पवार, कोमल मेवाणी, युवा नेत्या कोमल शिंदे, उपासना काटे, पल्लवी सासवडे, विजया काटे, भाग्यश्री देशमुख, रेश्मा खरात, मनीष सिद्धानी, सुनील साठे, दिनेश मेवाणी, सोनू म्हात्रे, छाया भडकुंबे, मंगल पवार, राजाराम जाधव, शिवा पिल्ले, रणजीत सिंग, राजकिरण दाभाडे, रंगनाथ साळवे, सलोनी सूर्यवंशी, साखरबाई बोरुडे, कोमल तडसरे, केसरबाई तडसरे, रणजीत कांबळे, आकाश सिंग, मंगल जाधव, अविष्कार बनसोडे, स्वाती सूर्यवंशी, केसरबाई तुरुकमारे, पुनम रोकडे, श्रद्धा रोकडे आदी उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group