सातारा (Pclive7.com):- पोलादपूर येथे एक खासगी बस घाटात कोसळल्याचं वृत्त आहे. महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर अंबारी घाटात ही बस कोसळली असून त्यात ४० जण अडकल्याचा अंदाज आहे. या अपघातात जीवितहानी अथवा जखमी झाल्याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बसमधील प्रवासी हे दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे. ही बस पोलादपूर ते महाबळेश्वर असा प्रवास करत होती. अपघातानंतर पोलीस आणि साताऱ्याच्या गिर्यारोहकांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले असून धुक्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
पोलादपूर घाटात २०० फूट दरीत खासगी बस कोसळली






















Join Our Whatsapp Group