पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणुक प्रक्रीया सुरू झाली. महापालिका मुख्यालयातील नगरसचिव कार्यालयात आज दि.३१ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज दाखल करण्यात येणार आहे. काही वेळातच कोणाची वर्णी लागणार हे देखील स्पष्ट होणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदावरून गेल्या आठवडाभर बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. माळी कार्ड, कुणबीसाठी मुख्यमंत्री भेट, खांदेश पुत्राला संधी द्या, अशा दबावतंत्रांमुळे या निवडीला चांगलीच रंगत आली असून उत्सुकता शिगेला पोहचली आहे. महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याचा फैसला आज होणार आहे.
आज मंगळवार दि. (३१) दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र) स्वीकारले जाणार आहेत. महापालिकेच्या नगरसचिव उल्हास जगताप यांच्या दालनात हे अर्ज दाखल केले जातील. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकाचाच अर्ज दाखल झाला, तर दोघांचीही निवड बिनविरोध निश्चित होईल. त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा शनिवारी (दि.४) विशेष सर्वसाधारण सभेत सकाळी अकरा वाजता होईल. या निवडणुकीसाठी पीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हि विशेष सभा होणार आहे.






















Join Our Whatsapp Group