पिंपरी (Pclive7.com):- किवळे येथील मुकाई चौकातील सर्व्हे क्रमांक ४० मधील ‘लोटस लक्ष्मी’ येथे सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. बांधकाम मजुरांसाठी झालेल्या या शिबिरात ११५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रुग्णांना यावेळी मोफत औषधांचे आणि विविध आजारांबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबतची माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र राज्य आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले. माजी महापौर योगेश बहल, लोटस ग्रुपचे संचालक संतोष कर्नावट, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. सुनील जॉन, स्त्रीरोगतज्ज्ञ श्रीमती डॉ. सूर्यवंशी, पुनावळे येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ठोणे, बालरोग तज्ज्ञ श्रीमती डॉ. क्षिरसागर, किवळ्याचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. जी. सांगडे, चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित माने आदी या वेळी उपस्थित होते.
लहान मुलांचे लसीकरण, गरोदर मातांची नावनोंदणी व तपासणी, धनूर्वात लसीकरणही या वेळी करण्यात आले. रक्तदाब, मधूमेह, जनरल तपासणी, बालरोग तपासणी, कर्करोग, स्त्रीरोग, त्वचारोग, हिवताप, मलेरिया, कुष्ठरोग, क्षयरोग, संसर्गजन्य आदी तपासण्याही या शिबिरात करण्यात आल्या. डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यूबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.





















Join Our Whatsapp Group