पिंपरी (Pclive7.com):- देशी बनावटीचे ४ पिस्तुल आणि ८ जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणलेल्या आरोपीला निगडी पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी निगडी येथील ओटास्कीम जवळ करण्यात आली. यावेळी आरोपीकडून १ लाख १९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अनुप नवनाथ सोनवणे (वय २८, रा. निगडी ओटास्किम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी ओटास्किम येथे एका इसमाने देशी बनावटीचे पिस्तुल विक्रीसाठी आणले असल्याची पोलीसांना माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी अनुप सोनवणे याच्या घरी धाड टाकून आरोपीसह ४ देशी बनावटीचे पिस्तुल आणि ८ जिवंत काडतुसे असा १ लाख १९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आले. विनापरवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अनुप सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास निगडी सहायक पोलीस निरिक्षक पाटील करत आहेत.





















Join Our Whatsapp Group