पुणे (Pclive7.com):- थेऊर येथील राइस एन शाइन बायोटेक कंपनीला आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत जीवितहानी झाली नसली, तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. ही आग विझवण्यासाठी ७ ते ८ अग्निशमन दलाचे बंबांना पाचारण करण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.
थेऊर परिसरात असलेल्या गणेशवाडी येथे शिक्षणसम्राट पी. डी. पाटील यांच्या मालकीच्या फार्म हाऊसच्या आवारात राइस एन शाइन बायोटेक कंपनी आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील हे आपल्या पोलीस पथकासह दाखल झाले आहेत. घटनेत जीवितहानी झाली नसून लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान ७ ते ८ बंबाद्वारे प्रयत्न करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.