सातारा (Pclive7.com):- ‘ऐतिहासिक मंगळवार तळे हे आमच्या राजघराण्याच्या मालकीचे आहे. त्यामुळे माझ्या मालकीच्या तळ्यात गणेश मूर्ती विसर्जनासाठी कोणाची परवानगीची आवश्यकता नाही. पोलिसांनी वेढा दिलातरी तळ्यात विसर्जन होणार आहे. कोण अडवतो ते बघतोच’, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध केला आहे.
उदयनराजे यांनी सातारा शहरातील गणेश मंडळांची तातडीची बैठक पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, सर्व गणेश मंडळांनी ऐतिहासिक मंगळवार तळ्यातच विसर्जन करावे. कोण अडवतो ते बघतोच. गुन्हे दाखल झाले तर माझ्यावर होतील, मंडळावर नाही. सातारच्या जनतेसाठी मी काहीही करायला मागे पुढे बघणार नाही. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर जिल्हा प्रशासन जबाबदार राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले.






















Join Our Whatsapp Group