पिंपरी (Pclive7.com):- संसदेत सर्वांत पहिल्यांदा धनगर आरक्षणावर प्रश्न विचारणारा खासदार मी आहे. कायम आपण धनगर आरक्षणाच्या बाजूनेच राहणार असून पुन्हा आरक्षणाबाबत संसदेत प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. अॉल इंडिया धनगर समाज आणि पिंपरी चिंचवड शहरातील समाज बांधवांनी खासदार बारणे यांची भेट घेऊन आरक्षण मिळावे याबाबत निवेदन दिले. त्यावेळी खासदार बारणे यांनी शिष्ठमंडळाला संसदेत प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी चिंचवड शहर आघाडीचे अध्यक्ष दिपक भोजने, युवा आघाडीचे अध्यक्ष महावीर काळे, पश्चिम महाराष्ट्र संर्पक प्रमुख सुनिल बनसोडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बंडू मारकड, उपाध्यक्ष दादासाहेब कोपनर, संजय कवितके, गोवर्धन कांबळे, कार्याध्यक्ष नवनाथ देवकाते, धनंजय गाडे, संतोष पांढरे, तानाजी गाढे, निलेश वाघमोडे, विजय महानवर, बाबा पाटील, अॅड. संतोष महानवर, हनुमंत हाके तसेच महासंघाचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group