भोसरीमध्ये साजरा होणार १९ वा वर्धापन दिन
पिंपरी (Pclive7.com):- जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त जुन्नरभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. येत्या १ नोव्हेंबर रोजी भोसरी येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे.
कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शिवाजीराव आढळराव राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती विशाल तांबे, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेविका अनुराधा गोफणे, उषा मुंडे, नगरसेवक लक्ष्मण ऊंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ह.भ.प.पांडूरंग महाराज घुले यांना जुन्नर भूषण, आमदार शरद सोनवणे यांना जुन्नर विकासरत्न, आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार ठिकेकरवाडी व बेल्हे येथील समर्थ महाविद्यालयास शिवजन्मभूमी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याखेरीज विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय व समाज हिताची कामगिरी केलेल्या जुन्नरच्या भूमिपुत्रांचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये शिवनेर पतसंस्था, भोसरी (सहकार), शिवाजीराव चाळक (साहित्य), मंगेश आमले (उद्योजक), बाळकृष्ण नेहरकर (कला व सांस्कृतिक), निशा पिसे (पत्रकार), अक्षय बोऱ्हाडे (सामाजिक), निलेश घोलप (आदर्श शेतकरी), राहुल खर्गे (क्रीडा), इंदिरा आस्वार डावरे (प्रशासकीय), सार्थक मटाले (विशेष प्राविण्य) यांचा समावेश आहे. यानिमित्त बाळकृष्ण नेहरकर यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित खर्गे व संपर्क प्रमुख उल्हास पानसरे यांनी दिली.
मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे, सचिव अॅड. संतोष काशिद, उपाध्यक्ष कैलास आवटे, सुहास गटकळ, खजिनदार मिननाथ सोनवणे, अण्णा मटाले, योगेश आमले, एस. आर. शिंदे, नवनाथ नलावडे, सुहास वाघ, दीपक सोनवणे, अमोल बांगर, इंद्रजित पाटोळे, अॅड. महेश गोसावी, श्वेता पाटे, स्वप्निल पोखरकर यांनी संयोजनात पुढाकार घेतला आहे.
























Join Our Whatsapp Group