पिंपरी (Pclive7.com):- निगडी चौक ते आकुर्डी परिसरात सुरू असलेल्या मेट्रो रेलच्या कामांमुळे रस्त्यावर माती व मुरुम मोठ्या प्रमाणात सांडला असून त्यातून चिखल निर्माण झाला आहे. यामुळे रस्त्यावरून दुचाकी घसरत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. स्थानिक नागरिकांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सदर परिस्थिती लक्षात घेता मेट्रो प्रशासनाने तातडीने योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्त्यांवरील माती तात्काळ हटवून नियमित साफसफाई आणि पाणी मारण्याची आवश्यकता असल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, मेट्रो अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाने मेट्रो प्रशासन तसेच महापालिका आरोग्य व स्वच्छता विभागाच्या रोड क्लिनर व्हेईकल आणि रोड वॉशर व्हेईकल यांना संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
























Join Our Whatsapp Group