नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलेल्या मुलाखतीत मोदींनी अनेक विषयांवर भाष्य केले होते. मोदींच्या या मुलाखतीवर विरोधक टीका करत असतानाच राज ठाकरे यांनीही आपल्या व्यंगचित्राद्वारे त्यांच्यावर टीका केली आहे. या व्यंगचित्रात पंतप्रधान मोदी एका खुर्चीवर बसले आहेत. तर मुलाखत घेणारे व्यक्तीही मोदीच असल्याचे त्यांनी यात दाखवले आहे. या व्यंगचित्राला त्यांनी ‘एक मनमोकळी मुलाखत’ असे शीर्षक दिले. तसेच यामध्ये मुलाखत घेणारे मोदी, मुलाखत देणाऱ्या मोदींना ‘काय विचारू’ अशी विचारणा करत असल्याचे दाखवले आहे. यावरून मोंदीची मुलाखत ही मॅनेज होती, हे दिसून येते, अशी टीका राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्राद्वारे रेखाटले आहे.
‘एक मनमोकळी मुलाखत’, राज ठाकरेंचे मोदींच्या मुलाखतीवर व्यंगचित्रास्त्र

























Join Our Whatsapp Group