
नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
सगळं काही संपलेलं नाही अजूनही आशा आहे की आपण लढाई जिंकू शकतो. उद्या काय काय घडेल मला माहीत नाही. जगात बरंच काही चाललं आहे. मध्यंतरी मी एक ट्वीट केला होता तो खूप गाजला. मी म्हटलं की मराठी माणूस महिन्याभरात भारताचा पंतप्रधान होईल. मला अनेकांचे फोन आले, तुमच्या वक्तव्याचा अर्थ काय? हे कसं होईल? असं मला अनेकांनी विचारलं. काहींनी विचारलं की तुम्ही होणार का? मी जे बोललो त्याची पार्श्वभूमी कुणालाच माहीत नव्हती. आता मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर आत्ता त्या पदावर असलेल्या व्यक्तीला बाजूला गेलं पाहिजे. बदल घडण्याची शक्यता मला दिसते आहे. पण बदल घडला तर काँग्रेसचा पंतप्रधान होणार नाही कारण आमच्याकडे बहुमत नाही. भाजपाचाच पंतप्रधान होईल पण कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता. असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ज्यावरुन राजकीय वर्तृळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.
इस्रायलच्या गुप्तहेराने स्टिंग ऑपरेशन केलं आहे
पुढे पृथ्वीराज म्हणाले, अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्रायलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत, आता लवकरचं तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळं अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार आहे. अमेरिका सरकार एक कायदा करुन येत्या १९ डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे असा दावा चव्हाणांनी केला आहे. आता यात कोणाकोणाची नावं आहेत? याची मला फारशी कल्पना नाही. असं म्हणत चव्हाणांनी अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता वर्तवली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जनगणमन या पुस्तकाच्या प्रकाशन केल्यानंतर चव्हाणांनी भारतात १९ डिसेंबरला राजकीय भूकंप होण्याचं भाकीत केलं.
एपस्टिनने स्टिंग ऑपरेशन केलं आहे-चव्हाण
एपस्टिनने जे स्टिंग ऑपरेशन केलंय त्यात बरेच फोटो, दृश्यं अशा अनेक गोष्टी आहेत.७५ हजार फोटो पब्लिश झाले आहेत. २० हजार इमेल गेले आहेत. हा सगळा डेटा सर्च करता आला पाहिजे आणि डाऊनलोड करता आला पाहिजे असं अमेरिकेने म्हटलं आहे. ही सगळी माहिती जाहीर होणार आहे. १९ डिसेंबरला काय होतं मला माहीत नाही. पण अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.



























Join Our Whatsapp Group