पिंपरी (Pclive7.com):- आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आरपीआय (आठवले) पक्षाला सन्मान जनक जागा न सोडल्यास महायुतीतील इतर पक्षांचा पर्याय खुला ठेवण्यात येईल असा निर्णय आरपीआय (आठवले) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे सर्व नेते मंडळी व महिला आघाडीचे नेत्या शहर पदाधिकारी यांची एकत्रित बैठक महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत यांच्या कार्यालयात पार पडली, या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

महायुतीच्या नियमानुसार प्रथम प्राधान्य भाजप पक्षास असेल पण त्यांनी सन्मान जनक जागा न सोडल्यास महायुतीतील घटक पक्ष यांच्याशी चर्चा करण्याचे पर्याय खुले ठेवण्यात आले आहेत. चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका सर्वच नेते मंडळींनी घेतली.

ही बैठक बाळासाहेब भागवत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस अजिज भाई शेख, के.एम. बुक्तर, मारुती जकाते, कमलताई कांबळे, लताताई ओव्हाळ, ईलाबाई ठोसर, बाळासाहेब रोकडे, सुरेश निकाळजे, विलास कांबळे, बाबा सरोदे, दयानंद वाघमारे, विक्रम कांबळे, लिंबराज कांबळे, दिलीप साळवे, दशरथ ठाणंबिर, रमेश शिंगारे, प्रमोद वाघमैतर, रमेश गजरमल, बापू सरोदे, अक्षय दुनगव, जयवंत सोनवणे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

























Join Our Whatsapp Group