बर्डव्हॅली ‘मजूर शिल्प’ उद्यान येथे रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन
पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र सरकारने रिक्षा परवाना खुला केला असुन पिंपरी चिंचवड शहरात ७००० पेक्षा अधिक नवीन रिक्षा आल्या आहेत. नवीन रिक्षासाठी नवीन रिक्षा स्टॅन्ड उपलब्ध झाले पाहिजे. पोलीसांकडून मात्र रिक्षा चालकांना रिक्षा स्टॅन्डसाठी जागा उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांच्या विरोधात कारवाई केली जाते. याबाबत रिक्षा चालकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना मात्र वेळ नाही. अशा परिस्थितीत रिक्षा चालकांनी आपले गाऱ्हाणे कोणाकडे मांडायचे असा प्रश्न उपस्थित करत सरकारच्या चुकीच्या धोरणा बाबत महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी टिका केली असुन रिक्षा चालकांचे प्रश्न सरकारने सोडवावेत अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न बर्ड व्हॅली मजूर शिल्प उद्यान संभाजीनगर चिंचवड येथे नविन रिक्षा स्टॅन्ड उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजय थोरात, पंचयत कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, फारूक कुरेशी, आयफाज कुरेशी, निलेश खिलारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी राजु शेख, विकास गायकवाड, धिरज कांबळे, विनोद वाघमारे, कालिदास भोसले, राजेंद्र कांबळे, संदीप भोसले, महेश गायकवाड, आकाश मोरे, शंकर मोरे, बालाजी उबाळे यांनी परिश्रम घेतले.
























Join Our Whatsapp Group