नगरसेविका उषाताई वाघेरे यांच्या प्रयत्नांना यश
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या नुतनीकरणासाठी आणि श्री काळभैरवनाथ मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी स्थायी समितीच्या माजी सभापती, नगरसेवका उषाताई संजोग वाघेरे यांच्या प्रयत्नांना यश आले अाहे. महापालिकेने नुकतीच (दि. ५ मार्च रोजी) या कामाच्या अनुक्रमे ८३ लाख १० हजार ३३३ रूपये आणि ५ कोटी ८१ लाख २८ हजार ९८२ रूपयांच्या निविदा प्रसिध्द केल्या असल्याची माहिती वाघेरे यांनी दिली आहे.
या दोन्ही कामांसाठी उषा वाघेरे यांनी मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा केला होता. दिनांक १९ डिसेंबर २०१४ रोजी तत्कालीन आयुक्तांना प्रभाग दौऱ्यामध्ये ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून, या दोन्ही कामांमुळे पिंपरीगांवच्या वैभवात भर पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन स्मारकांमध्ये रायगडावरील सिंहासनाधिष्ठीत पुतळयाची प्रतिकृती बनविण्यात येणार असून आकर्षक मेघडंबरी बसविण्यात येणार आहे. तसेच भैरवनाथ मंदिर नव्याने बांधून, आता ते काळ्या दगडी कामांमध्ये, आकर्षक स्वरूपात बांधण्यात येणार आहे. अशी माहिती उषा वाघेरे यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group