पिंपरी (Pclive7.com):- नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे व नगरसेविका निर्मलाताई कुटे यांच्या सतत पाठपुराव्यामुळे पिंपळे सौदागर येथे लवकरच ‘शिवसृष्टी’ साकारणार आहे. स्मशानभूमी जवळील परघळे कॉर्नर येथील आरक्षण क्र.३६२ मधील आरक्षित असलेले १ एकर क्षेत्रातील विकसीत करावयाचे स्केटिंग ग्राऊंड, वॉचमेन हाऊस, टॉयलेट ब्लॉक, चेंजिंग रूम या सोबत सदर प्ले-ग्राऊंडच्या सुरक्षा भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग दर्शवणारे ‘शिवसृष्टी शिल्प’ या ऐतिहासिक वास्तू शिल्पाचे भूमिपूजन चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी पवना सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन जयनाथ शेठ काटे, उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, सामाजिक कार्यकर्त्या चंदाताई भिसे, कॉन्ट्रॅक्टर एस.एस.साठे, प्राजक्ताताई सुनिल झिंजुर्डे, भारतीताई कुंदन जाचक, शितलताई काळुराम झिंजुर्डे, भानुदास काटे पाटील, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, अर्जुन काटे, हेमराज कवडे, शेखर कुटे, जगन्नाथ काटे, दत्तोबा काटे, प्रकाश झिंजुर्डे, संजय कुटे, मैत्राजी, विजय काटे, अजय कदम, निलेश कुंजीर, महेंद्र झिंजुर्डे, रोहिदास नवले, प्रविण कुंजीर, बाळासाहेब परघळे, सतीश परघळे, गणेश झिंजुर्डे, समीर देवरे, दिपक गांगुर्डे, संजय भिसे, कैलास काटे, काळुराम झिंजुर्डे, विकास काटे, सतीश काटे, श्रीपाद काटे पाटिल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group