पिंपरी (Pclive7.com):- गेल्या दहा वर्षांपासून पिंपरी विधानसभा मतदारसंघातील जनतेची खोट्या आश्वासनांवर बोळवण करून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आजी-माजी आमदारांनी केला आहे. मात्र यावेळी पिंपरीतील जनता या आमदारांच्या भूलथापांना बळी न पडता या दोघांनाही घरचा रस्ता धरायला लावेल, असा घणाघात अपक्ष उमेदवार युवराज दाखले यांनी केला आहे.
पिंपरी विधानसभेत अपक्ष उमेदवार युवराज दाखले हे ‘ऑटो रिक्षा’ या चिन्हावर निवडणूक लढवत असून त्यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार आण्णा बनसोडे आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात जोरदार मोहीम उघडली आहे.
यासंदर्भात बोलताना दाखले म्हणाले की, मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पिंपरी मतदारसंघात सर्वाधिक मतदार हा झोपडपट्टीधारक आहे. याच मतदारांना विकासाच्या भूलथापा देत गेल्या दहा वर्षांपासून बनसोडे आणि चाबुकस्वार या दोन्ही आजी-माजी आमदारांनी त्यांचा फक्त मतांच्या राजकारणासाठी वापर केला. मात्र दहा वर्षांपासून विकासाचा दावा करणाऱ्या आमदारांना आजही पावसाळ्यात पुराचे पाणी घरात घुसणाऱ्या सर्वसामान्य झोपडपट्टीधारकांना सुरक्षित आसरा उपलब्ध करून देता आलेला नाही की झोपडपट्टीतील तरुणांच्या हातांना उद्योगधंदा अथवा काम देता आलेले नाही.
पिंपरीतील मतदार यावेळी जागृत झाली असून आजी-माजी आमदारांकडून दर निवडणुकीत होणारी फसवणूक त्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे या दोन्ही आजी-माजी आमदारांना मतपेटीद्वारे धडा शिकवून घरचा रस्ता दाखविण्यासाठी समस्त पिंपरीकर उत्सुक असल्याचा दावा अपक्ष उमेदवार युवराज दाखले यांनी केला आहे.
























Join Our Whatsapp Group