पिंपरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस दरवर्षी समाजोपयोगी उपक्रमाने साजरा केला जातो. यावर्षी २७ नोव्हेंबर रोजी साजरा होणारा वाढदिवस आमदार लांडगे यांनी भोसरी मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींना समर्पित केला आहे.
दरवर्षी आमदार लांडगे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. दुष्काळग्रस्तांना मदत करणे, पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावले, इंद्रायणी थडीच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उभा करणे किंवा पर्यावरण विषयक उपक्रम राबवून समाजाचे आणि पर्यावरणाचे आपण देणे आहोत, ही भावना मनात बाळगून कार्य केले जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षी लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणता नवीन उपक्रम राबविला जाणार याची उत्सुकता भोसरी विधानसभा मतदार संघातील नागरिकांना लागलेली असते. गतवर्षी आमदार लांडगे यांनी त्यांचा वाढदिवस ज्येष्ठ नागरिकांना समर्पित केला होता. यावर्षीचा वाढदिवस त्यांनी भोसरी मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींना समर्पित केला आहे. यानिमित्ताने दिव्यांगांना साहित्य वाटप केले जाणार आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी संबंधितांना आमदार महेश लांडगे यांच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधून नावाची नोंदणी करायची आहे. त्यासाठी सचिन फोंडके 7720043862, संदीप ठाणेकर 9765649797 यांच्याशी संपर्क साधवा असे आवाहन केले आहे.
























Join Our Whatsapp Group