पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील ‘क्वीन्स टाउन’ हाऊसिंग सोसायटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या ४० बेडसच्या कोविड केंद्राचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सुजीत पाटील, सचिव शिरीष पोरेड्डी, खजिनदार युजीन वराडकर आदी कार्यकारी मंडळ आदी उपस्थित होते. वैद्यकीय टिमप्रमुख डॉ.विजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ अभिक्षित काळे, डॉ योगेश आगरवाल हे काम पाहत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या रुग्णांना रुग्णालयाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा लक्षात घेऊन क्वीन्स टाउन सोसायटीने पालिकेची परवानगी घेवून हे सेंटर उभारण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्ष सुजीत पाटील यांनी यावेळी दिली. यावेळी कोविड सेंटरमध्ये ४० बेड, रुग्णास औषधी, गोळ्या, चहा नाष्टा, जेवण, रुग्णवाहिका, तज्ञ डॉक्टर्स अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे.
अतिरिक्त आयुक्त पवार म्हणाले कि, कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांची रुग्णाबद्दल अनास्था पहायला मिळत आहे. जेव्हा मी स्मशानभूमीला भेटी दिल्या तेव्हा कळले कि १७ मृतांच्या अस्थी नातेवाईकांनी नेल्या नव्हत्या. कोरोना रोगाबद्दल मीडियाच्या माऱ्यामुळे नागरीक घाबरून जात आहे. कोरोनापेक्षा ताण घेवून व हृदयाच्या तीव्र झटक्याने रुग्ण मरत आहे. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देण्याची गरज आहे. हि स्वच्छ व सुंदर सोसायटी असल्याचे सांगत सोसायटी संचालकांचे कौतुक केले. यावेळी सोसायटीच्या वाटचालीची माहिती सचिव पोरेड्डी यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुरेश गारगोटे मानले.
अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांची संपूर्ण ओळख आणि त्यांच्या संपूर्ण सेवेमध्ये केलेल्या कार्याची माहिती आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या कामातून वाढलेली लोकप्रियता आणि सोसायटीच्या संपूर्ण कार्यक्रमाची आणि चाललेला कारभाराची, मिळालेल्या पुरस्कारांची माहिती सुरेश गारगोटे यांनी दिली.
























Join Our Whatsapp Group