भोसरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष ऋषीकेश भाऊ रासकर यांनी आपला वाढदिवस अनाथ मुलांसोबत जाऊन साजरा केला.
कोरोना या महामारीमुळे जगावर आलेले संकट हे खुप मोठे असुन यामुळे अनेक सामाजिक काम करणाऱ्या संस्थाना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने आपण या समाजाचं काहितरी देणं लागतो. हा उद्देश ठेवुन रासकर यांनी दिघी गावातील तीन अनाथ आश्रमांना भेट देवुन अन्नधान्य वाटप व मुलांना नाष्ट्याचे नियोजन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ओबीसी सरचिटणीस योगेश आकुलवार यांनी केले. यावेळी उदय गायकवाड, शंकर लोंढे, ललित म्हसेकर, अनिल रासकर आणि मित्र परिवार उपस्थित होता.






















Join Our Whatsapp Group