पिंपरी (Pclive7.com):- शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी सुनिल झोंबाडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
शिवशाही व्यापारी संघचे प्रदेश सचिव आशिष वाळके यांच्या सुचनेने व प्रदेश संघटक रविकीरण घटकार यांच्या अनुमोदनाने सुनिल झोंबाडे यांची शिवशाही व्यापारी संघच्या प्रदेशअध्यक्षपदी निवडीची घोषणा संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली.
भोसरी येथील मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी शिवशाही व्यापारी संघाची बैठक पार पडली. यावेळी उद्योजक तथा भारतीय लहुजी पँथर संस्थापक अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांच्या हस्ते निवडीचे नियुक्ती पञक सुनिल झोंबाडे यांना देण्यात आले.
नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष सुनिल झोंबाडे यांनी दिव्यांग बांधव, महिला भगिनी, तसेच सर्वसामान्य जनता व व्यापारी वर्गाची अविरत सेवा करावी अशी सुचना संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी देऊन मनपूर्वक आभिनंदन व शुभेच्छा दिल्या.






















Join Our Whatsapp Group