पिंपरी (Pclive7.com):- सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर व एम.डी फिटनेस रावेत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.०३ जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. संजीवनी ब्लड बँक भोसरी यांच्या सहकार्याने रावेत येथे हे शिबीर पार पडले. यात १५५ दुर्गसेवकांनी रक्तदान केले.
शिबिराची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करू करण्यात आली.
यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्रीचे मार्गदर्शक श्री.नंदकिशोर देशमुख, म्हाळुंगेचे सरपंच श्री.मयूर भांडे, देहूरोड छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. यदुनाथजी डाखोरे व सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रा.श्रमिक गोजमगुंडे आदी उपस्थित होते.
अवघ्या ४ तासात प्रचंड प्रतिसाद देत तब्बल १५५ रक्तदातांनी रक्तदान केले. महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत असताना सलग दुसऱ्यांदा शिबिराचे आयोजन करून यशस्वी रित्या पार पाडणारी संस्था सह्याद्री प्रतिष्ठान ठरली.
लॉकडाऊनच्या काळात सलग २ महिने सह्याद्रीचा महासंकल्प भव्य रक्तदान शिबिर या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे १०० ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून तब्बल १०,२३३ बॅगा जमा करून महासंकल्प पार पडण्यात आला. तसेच या महासंकल्पाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड यांनी देखील घेतली आहे.






















Join Our Whatsapp Group