पिंपरी (Pclive7.com):- आंतरराष्ट्रीय महिला दिनच्या निमित्ताने भारतीय वाणिज्य व उद्योग-महाराष्ट्र जीवन कौशल्यच्या वतीने ‘विविध पैलूूंमधील स्त्रियांचे कल्याण’ या विषयावर वेेेबिनार आयोजित करण्यात आले होते.
महाराष्ट्र स्किल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ.श्रद्धा कुलकर्णी आणि उपाध्यक्ष मोनिका जोशी यांनी भारतभरातील आठ तज्ञांसह हा कार्यक्रम आयोजित केला होता. तर एलिट टास्क फोर्सच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
या वेबिनारमध्ये डी.आर अर्चना सारडा-क्लिनिकल डायबेटोलॉजिस्ट-फिजिकल हिट, डॉ. दीप्ती लेले- सायबर लॉ ट्रेनर-कायदेशीर कल्याण, संध्या माथुर-इमोशनल वेलिंग-पीसीसी मान्यता प्राप्त प्रशिक्षक, राहुल शिरोडकर – नॉर ब्रम्से येथे खरेदी-विक्री प्रमुख, महेश मंगनानी – वरिष्ठ विश्लेषक-सीव्हीके सल्लागार-आर्थिक सुदृढ, श्रीमती किरण शेंबेकर-मानसिक आरोग्य-समुपदेशक आणि प्रशिक्षक, सुश्री ऐश्वर्या चव्हाण-अध्यात्म व प्रेरक प्रशिक्षण-आध्यात्मिक कल्याण, डॉ. फौजिया खान सदस्य राज्यसभा सामाजिक आणि राजकीय यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.
तर या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून पीसीएमसीचे सहआयुक्त अजित पवार यांना आमंत्रित केले होते.एफईयूएल मधील डॉ. मयूरी राजेंद्र यांना अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले होते.
























Join Our Whatsapp Group