पिंपरी (Pclive7.com):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पिंपरी युवासेनेतर्फे कोरोना व लॉकडाऊन परिस्थितीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘कोरोना योद्धा’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने संजय गायखे (सामाजिक कार्यकर्ते), अतुल दौंडकर, (सामाजिक कार्यकर्ते) दिनेश तावरे (परिमंडळ अधिकारी अन्नधान्य वितरण विभाग), राजू बनसोडे (नगरसेवक), जयश्री कवडे (मंडलाधिकारी), शंकर अवताडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), महेंद्र गाढवे (पी.एस.आय), डॉ. विजया आंबेडकर (ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी), सुनील चव्हाण (आरोग्य निरीक्षक), कैलास पुरी (पत्रकार, झी२४ तास), संदेश पुजारी (संपादक, Pclive7.com), मिलिंद कांबळे (पत्रकार, दै.पुढारी), संगीता पाचंगे (पत्रकार), ऍड. विनोद यादव, ऍड. अजित बोऱ्हाडे या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळेस अविनाश जाधव, बुद्धीसागर गायकवाड, चिंचप्पा निन्गडोळे, महादेव गायकवाड, मनोज काची, प्रमोद गायकवाड, मोसीन शेख, शंकर शेंडगे, अक्षय हाडके उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी विभागसंघटक निलेश हाके यांनी केले होते.