पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सध्या कोरोना रुग्णाची संख्येत घट दिसत आहे. मात्र, अद्याप कोरोनाचे संकट टळलेले नाही. महापालिकेने कोट्यवधी रूपये खर्च करून बांधलेली थेरगाव व आकुर्डी येथील रुग्णालय पडून आहेत. पावसाळ्यापूर्वी ती तात्काळ सुरू करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
सध्या वायसीएम रूग्णालय कोरोना करीता राखीव ठेवले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर अनेक साथीच्या रोगावर उपचार करण्यासाठी नागरिकांनी पालिकेचे रूग्णालय उपलब्ध नाही. नवीन रूग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, तपासणी कक्ष, ‘क्ष’ किरण तपासणी, शस्त्रक्रिया कक्ष, पुरुष व महिलांचा मेडिकल वॉर्ड, अतिदक्षता विभाग, पॅथॉलॉजी लॅब, प्रसूतिगृह व नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग, सर्जिकल विभाग, डे केअर वॉर्ड तसेच, प्रतीक्षागृह, स्वच्छतागृह, उपाहारगृह, चोवीस तास औषधालय असावे. संपूर्ण यंत्रणा नवीन रुग्णालयात देऊन आकुर्डीचे रुग्णालय महिलांसाठी राखीव ठेवण्यात यावे.
कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच प्राथमिक लक्षणे, उपचार आणि इन्फ्रास्ट्रक्चर पालिकेने उभे करावे. स्वतः ऑक्सिजन उत्पादनाचे नियोजन करावे, अशी मागणी मयूर कलाटे यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group