पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन तसेच कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. याकाळात अनेक नागरिकांच्या आयुष्यावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेकांचे रोजगार गेलेत. हातावरचं पोट असणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून निश्चय फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने शहरातील सुमारे ३०० गरजू कुटूंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
निश्चय फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड व त्याचे सहकारी विश्वभुषण गायकवाड, नागेश दोडमनी, शंकर गायकवाड, सुरज शिवशरण, सचिन शिवशरण, राहुल तुसामड आदी यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व महात्मा फुलेनगर दापोडी या परिसरातील गरजूंना हे किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.