पुणे (Pclive7.com):- पुणे शहरातील कॅम्प परिसरातील वरशी मस्जिद जवळ म्हशींचा कळप उधळल्याने दुचाकीवरील पती- पत्नी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
शहनबाज अब्दुल रजाक कुरेशी, सदाकत कुरेशी आणी नदाफत कुरेशी ( सर्व रा.लष्कर) असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या म्हशीच्या मालकांची नावे आहेत.
याप्रकरणी जुबेर अस्लम शेख (वय-३८, रा. निलकंठ विहार) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कॅम्प भागातील वरशी मस्जिद या रस्त्यावरून जुबेर शेख व त्यांची पत्नी दुचाकीवरून निघाले होते. त्याच वेळेस त्या ठिकाणावरून म्हशींचा एक कळप चालला होता. त्यामुळे तक्रारदार शेख यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली. म्हशी जाण्याची वाट पाहत थांबले. मात्र त्या कळपातील एक म्हैस अचानक उधळली व दुचाकीवरील शेख व त्यांच्या पत्नीला यांना जोरदार धडक दिली.
दरम्यान, जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. तसेच दुचाकी चेही नुकसान झाले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी वरील म्हैस मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.























Join Our Whatsapp Group