पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक स्वर्गीय सुरदासजी गायकवाड यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त फुगेवाडी येथे किर्तन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका संध्याताई सुरदासजी गायकवाड यांनी केले होते.
रविवार, दि.२८ रोजी स्वर्गीय सुरदासजी गायकवाड यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या गतस्मृतींना उजाळा देण्यासाठी महंत ह.भ.प समाधान महाराज भोजेकर (खान्देश विभाग) यांचा किर्तन सोहळा पार पडला. तसेच याप्रसंगी फुगेवाडीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास वीणा भेट देण्यात आली.
त्यावेळी नादब्रम्ह भजनी मंडळ, गावातील जेष्ठ नागरिक संघ, ह.भ.प सोपानराव मुळे माजी नगरसेवक राजेंद्र काटे, लघुउद्योग अध्यक्ष संदीप बेलसरे, पुणे टकारी समाज अध्यक्ष शाहुल जाधव, तुषारभाऊ नवले, विश्वनाथ वाखारे, पांडुरंग फुगे, तुकाराम देवकर, हनुमंत गडेकर, नरहरी जाधव, संदीप गायकवाड, नितीन जाधव, सलिम शेख आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























Join Our Whatsapp Group